Marathwada Sathi

हार्दिक आणि कृणाल यांना पितृशोक…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान,याबाबत बडोद्याच्या क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर हट्टंगडी यांनी सांगितले की, ” पंड्या यांच्या कुटुंबियांसाठी ही सर्वात वाईट बातमी आहे. कृणाल पंड्याच्या वडिलांचे निधन झाले असून तो संघाला सोडून घरी पोहोचला आहे. त्यांच्या दुख:त आम्ही सर्व सहभागी आहोत.

Exit mobile version