Home औरंगाबाद पासवान यांनी औरंगाबादला सिपेटची देणगी दिली : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

पासवान यांनी औरंगाबादला सिपेटची देणगी दिली : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

0

रेल्वे मंत्री असतांना ६० हजार कंत्राटी कामगारांना पर्मनंट केले

औरंगाबाद : दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोजपाचे नेते रामविलास पासवान यांनी संभाजीनगरला सिपेटची देणगी दिली आहे. मी केलेल्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला रात्री १२ वाजता पत्र दिले. त्याच दिवशी सकाळी ३ वाजता दिल्लीत जाऊन त्यांनी सिपेट कॉलेजला मंजुरी दिली. सर्वाधिक काळ मंत्री म्हणून राहिले असतांना मला २० वर्ष त्यांनी सहकार्य केले. केमिकल अँड फर्टिलायझर मंत्री असतांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी भरपूर खते उपलब्ध करून दिले. त्यांच्यासमवेत विविध कमिटीचे सदस्य असतांना त्यांनी जिल्ह्यातील कुठलेच काम टाळले नाही.मी राज्यात मंत्री असतांना मी केलेल्या मागणीनुसार त्यांनी रेल्वेस्टेशनवर एका कार्यक्रमात देशातील ६० हजार कंत्राटी कामगारांना पर्मनंट करण्याचे वचन देत ते पाळले. दिल्लीत नेहमी मित्रपक्षांचा विचार करत असत.  त्यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले आहे, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here