Marathwada Sathi

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर प्रवासी बसचा अपघात; नऊ जण जखमी

मुंबई बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर बावधन सीएनजी पेट्रोल पंपानजीक खासगी प्रवासी बस उलटून अपघात झाला. या अपघातात ७ ते ९ प्रवासी जखमी झाले. मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडून बेंगळुरू जाणाऱ्या खासगी बस निघाली होती. बसमधे एकूण ३६ प्रवासी होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून बेंगळुरूच्या दिशेने स्लीपर कोच असलेली ट्रॅव्हल्स निघाली होती. जखमींवर रुग्णायात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version