Marathwada Sathi

राखेच्या प्रदुषणाला परळीकर कंठाळले!

ओम शिवाजीराव काळे या तरूणाचे अनोखे आंदोलन

परळी : परळी शहर आणि तालुक्यात राखेच्या प्रदुषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दररोज होणाऱ्या राखेच्या वाहतूकीमुळे ही राख रस्त्यावर पडते आणि ती वाहनांच्या चाकाने हवेत उडते. प्रचंड मोठ्या प्रमाणावर धुळ आणि राख ही परळीकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून, त्यामुळे अनेक आजारही उद्‌भवत आहेत. राखेच्या आणि धुळीच्या प्रदुषणाला त्रस्त झालेल्या युवकांनी परळीत मंगळवारी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. ओम शिवाजीराव काळे या युवकाने अनोख्या पध्दतीने निषेधाचे फलक हातात धरून लक्ष वेधून घेतले.

हातात राख आणि धुळीच्या प्रदुषणाच्या निषेधाचे फलक घेवून आंदोलनकर्त्या तरूणांनी शहरातील नागरीकांचे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या प्रदुषणाकडे ना पुढाऱ्यांचे लक्ष आहे, ता प्रशासनाचे. दररोजच्या त्रासाला कंठाळणाऱ्या नागरीकांनी याबाबत दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचाच उद्रेक आता होतांना पहावयास मिळत असून, सोशल मीडियावर या गोष्टींचा निषेध नोंदवण्याबरोबरच आता नागरीक रस्त्यांवरून रोष व्यक्त करीत आहेत. याचीच झलक मंगळवारी पहायला मिळाली. परळीतील ओम शिवाजीराव काळे या युवकाने अनोख्या पध्दतीने आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मौलाना आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) या ठिकाणी हाता म्हणी लिहीलेला फलक झळकावून निषेध नोंदविला.

Exit mobile version