Home औरंगाबाद अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त हानी औरंगाबाद तालुक्यात 200% पाऊस’

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त हानी औरंगाबाद तालुक्यात 200% पाऊस’

67
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । जिल्ह्यात 4 लाख हेक्टर पेक्षा जास्त पिके पाण्याखाली गेली आहे. याचा अहवाल नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासनाकडे पाठवला आहे. अतिवृष्टी झालेल्या तालुक्यामध्ये औरंगाबाद तालुका 200 टक्केच्या घरात पोहचला आहे.
यावर्षी जिल्हात 156 टक्क्यांपर्यंत पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मका, कापूस, बाजरी, ज्वारी, तूर, मूग, ऊस, उडीद, सोयाबीन भुईमूग, तीळ आदी पिकांची जवळपास 70 ते 75 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील जवळसपास सर्व तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले असून पीक नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शासनाकडे पाठवला असून नुकसान भरपाई साठी जिल्ह्याला 192 कोटींची मदत लागणार असल्याची मागणी करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस
औरंगाबाद- 194%
फुलंब्री – 130 %
सिल्लोड- 160 %
सोयगाव- 142
गंगापूर – 176 %
वैजापूर – 186 %
पैठण – 180%
खुलताबाद – 122%
कन्नड – 135 %

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here