जोडीदार हंसाचा मृत्यू झाल्याने हंस बसला रेल्वे रुळावर ,हंसासाठी २३ रेल्वेगाड्या धावल्या उशिराने
मराठवाडा साथी
बर्लिन : प्रेम करणाऱ्या प्रत्येकानेच सलीम अनारकली , लैला मजनूची कहाणी ऐकली असेल. प्रेमाच्या या कहाण्या प्रतीक मानल्या जातात. पण बर्लिन शहरात एका हंसाची कहाणी सध्या खूप वायरल होत आहे. संबंधित घटना जर्मनीतील आहे. जर्मनीतील कॅसल येथे दोन हंस चुकून एका वेगवान रेल्वे मार्गावर पोहोचले होते. या रेल्वे ट्रॅकच्या वर विद्युत तारा बसवण्यात आल्या होत्या. यातील एका हंसाला विजेच्या तारांचा धक्का बसला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं जोडीदाराच्या हंसाच्या मृत्यूनंतर दुसरा हंस त्याच रेल्वे मार्गाच्या जवळ बसला. आपल्या जोडीदार हंसाचा मृत्यू झाल्याने दुसरा हंस चक्क रेल्वे रुळावर जाऊन बसला . लोकांनी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही तिथून हटला नाही. मग काय ?
या घटनेमुळे स्थानिक लोकांनी फायर डिपार्टमेंट याबाबत माहिती दिली. फायर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रयत्नानंतर हंसाला रुळावरून हटवण्यात यश आलं. त्यानंतर या हंसाला जवळच्या एका नदीत सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं.फायर डिपार्टमेंटच्या या प्रयत्नांना सुमारे 1 तास लागला. यामुळं 23 गाड्या वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. त्यांना उशीर झाला. या हंसाच्या प्राणासाठी चक्क २३ ट्रेन उशिरा पोहचल्या . यातून एका हंसासाठी या देशातील प्रशासनाने घेतलेली हि तयारी आणि त्याला दिलेले महत्व याचे कौतुक केले जात आहे.पण एक गोष्ट मात्र यातून दिसून येते ती म्हणजे या हंसाचे प्रेम .त्या हंसाने प्रेमाचा आपलाही नमुना जगासमोर उभा केला आहे.