Marathwada Sathi

ऑस्कर विजेते संगीतकार एमएम कीरावानी यांना कोरोनाची लागण

कोविड पुन्हा वाढतोय आणि हळूहळू त्याची लागण होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.अलीकडेच अभिनेत्री किरण खेरनंतर पूजा भट्ट कोविडच्या विळख्यात आल्याची बातमी आली होती आणि आता ‘RRR’ सिनेमातील प्रसिद्ध गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑस्कर विजेते एमएम कीरावानी यांना कोविड झाल्याची बातमी समोर आलीय.आपल्या भारतीय मातीतला RRR सिनेमा यंदा ऑस्करच्या शर्यतीत होता. बेस्ट ओरिजिनल सॉंगच्या शर्यतीत RRR ला नामांकन मिळाले होते.RRR ने ऑस्कर पुरस्कारावर स्वतःचं नाव कोरलं. एम एम किरावानी हे RRR ला ऑस्कर मिळण्याचे खरे मानकरी आहेत.किरावानी म्हणाले कि.. अतिउत्साह आणि प्रवास माझ्या नाकीनऊ आलाय. मला कोविडची लागण झाली आहे आणि मी औषधोपचारांसह पूर्ण विश्रांती घेत आहे.ऑस्कर सोहळ्यात ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी मिळालेल्या पुरस्काराची आठवण करून देताना तो म्हणाला, ‘हे सारं काही काल्पनिक होतं.अमेरिकेतील पुरस्कार सोहळ्यांमध्ये आम्ही नेहमीच जिंकू. ‘नाटू नाटू’ गाण्याला अल्पावधीतच जगभरात एक वेगळी ओळख मिळाली.
ऑस्कर सोहळ्याविषयी एक खास गोष्ट समोर आलीय ती म्हणजे.. ऑस्‍कर सेरेमनीसाठी जागा राखून ठेवण्‍यासाठी चित्रपटाच्या टीमने किती पैसे खर्च केले होते? हा सर्व खर्च चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केला होता.मिळालेल्या माहितीनुसार, केवळ नाटु-नाटु चे संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्र बोस यांना ऑस्करमध्ये मोफत पास देण्यात आले होते.पण सर्वांनी पाहिले की, एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि इतर काही कुटुंबातील सदस्यही या मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांसाठी वेगळे तिकिटे काढण्यात आले होते .

Exit mobile version