Home परभणी परभणीत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त “होम मिनिस्टर ” स्पर्धेचे आयोजन

परभणीत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त “होम मिनिस्टर ” स्पर्धेचे आयोजन

225
0

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

परभणी : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) पुरस्कृत नई रोशनी लोक संचलित साधन केंद्र आणि श्री हरी डेपो होलसेल व रिटेल साडी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग नोंदविला. यावेळी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आपले होते. यात महिलांसाठी विविध खेळ , प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले होते.

“होम मिनिस्टर ” स्पर्धा :
,अहिलांसाठी खास “होम मिनिस्टर ” हा कार्यक्रम घेण्यात आला होता. हा कार्यक्रम बचत गटातील महिलांसाठी ठेवण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या महिलाना आणि विजेत्यांना बक्षिसेही प्रदान करण्यात आली. मानाची पैठणी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सौ ज्योती साळवे यांना देण्यात आली. तर दिव्तीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या सौ. लता एगडे व सौ. रंजना साळवे यांनाही पैठणी देण्यात आली. तर इतर 50 आकर्षक भेट वस्तु सहभागी महिला आणि मुलींना देण्यात आल्या.

यावेळी ज्योती बगाटे (अप्पर कोषागारअधिकारी),निता अंभोरे (जिल्हा समन्वय अधिकारी), श्री हरी डेपो होलसेल व रिटेल साड़ी सेंटर चे मालक ऋषिकेश सावंत, नई रोशनीच्या जयश्री टेहरे आणि होम मिनिस्टर प्रोग्रॅमचे प्रविण वायकोस यांची उपस्थिती होती. यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. संगीता शिंदे
मीरा कराळे ,कविता देवस्थळे,सत्यशिला उघडे ,पलवी गडकरी,तरामती गायकवाड ,सुरेखा खाडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here