Home परळी वैजनाथ फेस ऑफ परळी स्पर्धेचे आयोजन

फेस ऑफ परळी स्पर्धेचे आयोजन

355
0

“मराठवाडा साथी” वर्धापन दिनानिमित्त “परळी टाईम्स” चा उपक्रम
परळी l दैनिक मराठवाडा साथीच्या 41 व्या वर्धापन दिनाच्या औचित्यावर प्रायोजित फेस ऑफ परळी ही अनोखी स्पर्धा परळी टाईम्स या इन्स्टाग्राम पेजच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, प्रशासन आशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या चेहऱ्यांना प्रसिद्धीच्या पटलावर आणण्याचा याद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
फेस ऑफ परळी या स्पर्धेची प्रथम फेरी येत्या 7 जानेवारी रोजी होता आहे त्यानंतर 18 जानेवारी रोजी दुसरी फेरी आणि दि.26 जानेवारी रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेल्या मतांवर निवड केली जाणार असून, दुसऱ्या फेरीत त्यांच्या कार्याची पडताळणी केली जाणार आहे. सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुकांनी parli times या इन्स्टाग्रामवर तसेच timesparli@gmail.com या ईमेल पत्त्यावर किंवा 9307685040 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करणे आवश्यक आहे. चांगले व्यक्तिमत्त्व दुर्मिळ नसते ते शोधण्याची आपल्याला आवश्यकता असते. त्यामुळे परळी टाईम्स फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर याबाबतचे आपले मत नोंदवून योग्य चेहऱ्याची निवड करावी असे आवाहन स्पर्धेचे संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here