Home मुंबई राज्य सरकारने दिला आदेश ; मराठा आरक्षणाशिवाय होणार आकरावीसह सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश...

राज्य सरकारने दिला आदेश ; मराठा आरक्षणाशिवाय होणार आकरावीसह सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया

82
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे रखडलेली इयत्ता आकरावीसह सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाशिवाय पूर्ण कराव्यात असा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

शासन निर्णयात काय सांगितले आहे?

ज्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील परंतु त्यांना प्रवेश देण्यात आलेले नसतील, अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावे. हा शासन निर्णय मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील, असे या शासन निर्णयात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून संबंधित प्रशासकीय विभागांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबर २०२० नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडावी, असेही या शासन आदेशात म्हटले आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र. अं. खडसे यांच्या स्वाक्षरीने २४ नोव्हेंबर रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here