Home नाशिक कांद्याच्या दरात घट …

कांद्याच्या दरात घट …

69
0

मराठवाडा साथी न्यूज
नाशिक : कांदा दरात वाढ होईल, अशी शक्यता आहे.राज्यातील नाशिक, मुंबईतील वाशी तसेच पुणे येथील बाजार समित्यांच्या आवारात नवीन लाल कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात वाढीचे सध्या तरी दिसत नाही. निर्यातबंदी मागे घेतल्यानंतर कांदा दरात घट झाली असून प्रत्यक्ष निर्यात सुरू झाल्यानंतर पुढील पंधरा ते वीस दिवसांत कांद्याचे दर निश्चित होतील.केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी मागे घेतल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून गेले तीन ते चार दिवस बाजार समित्यांच्या आवारात कांदा कमी प्रमाणावर पाठविण्यात आला. परिणामी तीन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात एक किलो कांद्याला ३० ते ३२ रुपये दर मिळाला. रविवारी पुणे, नगर येथील बाजार समित्यांच्या आवारात कांदा मोठय़ा प्रमाणावर विक्री आहे.
पुण्यातील बाजारात कांदा दरात घट झाली. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार २३ ते २६ रुपये किलो दराने कांदा विक्री झाली, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.कांदा दर तूर्तास तरी वाढण्याची शक्यता नाही. पुढील पंधरा दिवसात कांदा निर्यातदार व्यापारी परदेशातील बाजारपेठेची चाचपणी करतील. त्यानंतर प्रत्यक्ष निर्यातीला सुरूवात होईल. तेव्हाच कांदा दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ही दरवाढ फार राहणार नाही. कांदा पाठविण्यास सुरूवात झाल्यानंतर कांदा दरात प्रतवारीनुसार एक किलोमागे दहा रुपयांपर्यत वाढ होण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात दहा किलो नवीन कांद्याला २०० ते २५० रुपये असे दर मिळाले आहेत. जुन्या कांद्याला १८० ते २२० रुपये दर मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here