Home क्रीडा भारतीय क्रिकेटपटूला न्यूझीलंडकडून ऑफर

भारतीय क्रिकेटपटूला न्यूझीलंडकडून ऑफर

80
0

नवी दिल्ली ; सूर्यकुमार यादवच्या खेळीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले खेळाडूही प्रभावित झाले आहेत. स्कॉट स्टायरिसने सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे. त्याने सूर्यकुमारला थेट आपल्या देशासाठी खेळण्याची ऑफर दिली आहे. स्टायरिस म्हणाला की, ‘जर सूर्यकुमार यादवला आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर तो परदेशात येऊ शकतो.’

 रॉयल चॅलेंजर बंगलोर विरूद्धच्या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली होती. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर नाबाद 79 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू असलेला सूर्यकुमार यादव गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी धमाकेदार खेळी करत आहे. केवळ आयपीएलच नाहीतर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही सूर्यकुमार उत्तम कामगिरी करत आहे. तरिदेखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आलेल्या भारतीय संघात सूर्यकुमार यादवचं नाव नसल्यामुळे सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here