Marathwada Sathi

औरंगाबादेत एनएसजी कमांडोची पोलिसांना फायटरने मारहाण

सहायक पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी

औरंगाबाद : पोलिसांनी नाकाबंदीत वाहन अडवून विनामास्क दारूच्या नशेत तर्रर असलेल्या एनएसजी कामांडोला दंडाची पावती घेण्याची सूचना करताच त्या कमांडोने दोन पोलीस जमादारावर हल्ला चढवला. यात एका जमादाराच्या हाताला चावा घेतला. तर एकाची मारहाणीत पॅन्ट फाडली. यावेळी त्याला अडवण्यासाठी पुढे सरसावलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला देखील कमांडोने फायटरने डोक्यात वार केला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे पाच ते पावणे सहाच्या दरम्यान छावणी भागातील नगरनाका येथे घडली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गणेश गोपीनाथ भुमे (३४, मूळ रा. फुलंब्री, ) असे अटकेतील कमांडोचे नाव आहे. तर या मारहाणीत सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भागीले, जमादार श्रीधर टाक आणि किशोर घोडेले जखमी झाले.

https://marathwadasathi.com/wp-content/uploads/2021/06/VID-20210630-WA0038.mp4

कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या दुपारी चारनंतर संचारबंदी लागू केली आहे. छावणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक पांडुरंग भागीले हे कर्मचाऱ्यांसह नगर नाका येथे नाकाबंदी करत होते. सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या बोलेरो जीप (एमएच-२०-एवाय-००११) जमादार घोडेले यांनी अडवली. यावेळी दारूच्या नशेत तर्रर असलेल्या कमांडो भुमे याला विनामास्क व दारूच्या नशेत वाहन चालवण्याच्या कारणावरून दंडाची पावती घेण्याचे सांगितले. त्यावर भुमे याने आपण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा बॉडीगार्ड असल्याची बतावणी करून पोलिसांना भुमे धमकावू लागला यावेळी त्याच्याकडे आयकार्ड बाबत विचारणा करताच त्याने थेट जमादार घोडेले यांच्यावर हल्ला चढवला. मारहाण करत असल्याचे पाहून दुसरे जमादार श्रीधर टाक मदतीला धावले. मात्र, त्याने दोघांना फायटरने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जवळच नाकाबंदी करत असलेले सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भागीले यांनी धाव घेत भुमेला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमांडो भुमे याने त्यांना देखील फायटरने बेदम मारहाण केली. छावणी पोलिसांनी भुमे भुमेला अटक केली आहे.

Exit mobile version