Marathwada Sathi

आता ‘पैसे ट्रान्सफर’ करण्यासाठी देखील द्यावे लागतील पैसे…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : जर तुम्ही नेहमी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ‘गुगल पे’ चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यन्त महत्त्वाची आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या ‘गुगल पे’ ने येणाऱ्या वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदल्यात कंपनीकडून ‘इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट’ हि सिस्टम देण्यात येणार आहे. ज्याकरता युजर्सना काही शुल्क द्यावे लागेल. दरम्यान हे शुल्क किती असेल याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे.

दरम्यान हि नोटीस गूगल कडून जाहीर होऊन ‘वेब अँप’ बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी युजर्स २०२१ च्या सुरुवातीपासून Pay.google अँपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर नाही करू शकणार. तसेच गुगल कडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, गुगल पे च्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.कंपनीने ‘गुगल पे’ च्या लोगोमध्ये देखील काही बदल केले आहेत.

Exit mobile version