Marathwada Sathi

आता पतीचे उत्पन्न जाणून घेण्याचा पत्नीलाही अधिकार

मराठवाडा साथी न्यूज

आता पतीचे उत्पन्न जाणून घेण्याचा पत्नीलाही संपूर्ण अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) दिला आहे. आपल्या पतीच्या उत्पन्नाची माहिती पत्नी ‘माहितीच्या अधिकारातंर्गत’ मिळवू शकते, असेही सीआयसीने म्हटले आहे.

जोधपूरमध्ये एका महिलेने याबाबतची तक्रार केली होती. तक्रारदार महिलेने तिच्या पतीच्या एकूण आणि करपात्र उत्पन्नाची माहिती मिळवण्यास नकार दर्शविला होता. त्याची दखल घेते सीआयसीने जोधपूरच्या आयकर विभागास आदेशाच्या तारखेपासून १५ दिवसांत महिलेला तिच्या पतीच्या उत्पन्नाची माहिती देण्याचे निर्देश दिले.

उत्पनाची माहिती तृतीय पक्षाशी संबंधित आहे आणि माहितीच्या अधिकारातंर्गत (आरटीआय) माहितीच्या अधिकारात याचा समावेश होत नाही, असा युक्तिवादही सीआयसीने नाकारला.

माहिती अधिकार विभागाने तिच्या पतीच्या उत्पन्नाची मागितलेली माहिती तृतीय पक्षाशी संबधीत असल्याचे सांगितचले होते. त्यानंतर जोधपूरच्या रहमत बानो यांनी दाखल केलेल्या अपीलवर हा निर्णय देण्यात आला.

Exit mobile version