Marathwada Sathi

आता SMS च्या मदतीने सरकार सांगणार;कोरोनाची लस कधी व कोठे मिळणार…!

मराठवाडा साथी न्यूज

सध्या जगभरात कोरोनामुळे कोरोनाने हाहाकार माजवला आहे.त्यामुळे सगळ्याच देशांमध्ये कोरोनाची लस बनविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. सध्या तीन कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असून या लसी आपापल्या देशांच्या नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक देश शक्य तेव्हढे प्रयत्न करीत आहेत.
भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी भारतातीलच आहे. यामुळे लस पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे कामाला लागली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी(२४ नोव्हें.) सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये लसीच्या वितरणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये मोदींनी लस कधी येईल हे आपल्या हाती नसल्याचे सांगितले. मात्र,याविषयी राजकारण करू नयेअसेही ते म्हणाले.दरम्यान,महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवावी अशी मागणी केली आहे.

कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता

कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे.

वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मिळणार लसी बद्दल माहिती

प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मिळावी याकरिता काही टप्पे ठरविण्यात आले आहेत. यानुसार सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरिअरना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे. याचबरोबर या मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे.पहिला डोस दिल्य़ानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. जेव्हा दोन्ही डोस दिले जातील तेव्हा एक डिजिटल QR आधारित सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हा लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. या साऱ्या तयारीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. यामध्ये कोरोना लसीचा स्टॉक, वितरण, लसीकरण आदी ट्रॅक केले जाणार आहे.

Exit mobile version