Home उस्मानाबाद आता भाजपचे “नमस्ते धाराशिव “

आता भाजपचे “नमस्ते धाराशिव “

227
0

उस्मानाबाद : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात उस्मानाबाद शहराचं नाव ‘धाराशिव’ करण्याचा वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भाजपने हा वाद काढला आहे. शहरभर बॅनर लावून भाजपने नवीन वाद निर्माण केला आहे.
भारतीय युवा मोर्चाकडून उस्मानाबाद शहरात ठिकठिकाणी ‘नमस्ते धाराशिव’ असं बॅनर लावण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलावी, अशी मागणी करण्यात येत आहे.नगरपालिकेला जे पत्र आलं आहे, ते सार्वजनिक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय युवा मोर्चानं दिला आहे.’धाराशिव’ हा शिवसेनेचाचा मुद्दा मागील 5 वर्षांत सरकार असताना नाव बदल्याण्याचे शहाणपण का सुचले नाही? असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपला केला आहे.दरम्यान या पोस्टरमुळे भाजप -शिवसेना वाडसोबतच उस्मानाबाद शहराचाही वाद चिघळण्याची श्यक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here