Marathwada Sathi

कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन मंजूर, पोलिस तपासात ठोस पुरावा न मिळाल्यामुळं मुक्तता

पुणेः व्यावसायिकाकडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक असलेला कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मारणेला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ‘पोलिस तपासात मारणे याच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मारणेची मुक्तता करण्यात आली.

खंडणीप्रकरणी मारणे याच्यासह त्याच्या १८ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मारणेला अटक केली होती. ‘मारणे याच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत. त्याचा खंडणीप्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा,’ अशी विनंती मारणेचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवादात केली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मारणे याची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले.

Exit mobile version