Home इतर मूलभूत अधिकारापेक्षा कोणताच अधिकार मोठा नाही ……!

मूलभूत अधिकारापेक्षा कोणताच अधिकार मोठा नाही ……!

86
0

धार्मिक अधिकार हा जगण्याच्या मूलभूत अधिकारापेक्षा मोठा नाही – मद्रास उच्च न्यायालय

तामिळनाडूमधील रंगनाथस्वामी मंदिरात कोरोना नियम पाळत उत्सव आयोजन करण्यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय

तामिळनाडू : रंगनाथस्वामी मंदिरातील मोहोत्सवाचे आयोजन करताना कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भातील निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. जर सरकार महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन धार्मिक स्थळासंदर्भात काही निर्णय घेत असेल तर आम्ही त्यामध्ये हस्ताक्षेप करु इच्छित नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्या. बॅनर्जी आणि न्या. सेंथिलकुमार राममूर्ती यांच्या द्विसदस्यीय खंडपिठाने ही सुनावणी केली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश देताना तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम रंगनाथस्वामी मंदिरामध्ये कोरोनाचे नियम पाळून, लोकांच्या आरोग्याची काळजी घेत उत्सव साजरा करणं शक्य आहे का याची पडताळणी करावी, असं म्हटलं आहे. धार्मिक गोष्टींसंदर्भातील अधिकार हा जीवनाच्या मूलभूत अधिकारापेक्षा मोठा नसल्याचं निरिक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. “धार्मिक परंपरा या जनहित जपणाऱ्या तसेच जीवनाचा अधिकार देणाऱ्या असायला हव्यात,” असंही न्या. बॅनर्जी म्हणाले.

न्यायालयाने यासंदर्भात धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करुन एक सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवड्यांनंतर होणार असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.भगवान विष्णूचं हे मंदिर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम येथे आहे.जे देशातील सर्वात मोठे मंदिर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here