Home मराठवाडा महाराष्ट्राचे उद्योग कोणी परराज्यात नाही नेऊ शकत

महाराष्ट्राचे उद्योग कोणी परराज्यात नाही नेऊ शकत

418
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. दरम्यान, उत्तर योगी आदित्यनाथ यांनी मिशन बॉलिवूड हाती घेतल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसने योगींवर थेट आरोप करत करत भाजपला टार्गेट केले आहे. उद्योजकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ सध्या मुंबईत आहेत. उद्योजक, बॉलिवूड कलाकारांसोबत योगी चर्चा करणार आहेत. राज्यातील उद्योग राज्यातच राहतील. इथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल तर शक्य होणार नाही, असे ठाकरे यांनी म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here