Marathwada Sathi

आता लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : १ जानेवारी २०२१ पासून लँडलाइनवरून मोबाईलवर कॉल करण्यासंदर्भातील नियमामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. यानुसार देशभरात लँडलाइनवरून मोबाईलवर काँल करण्यासाठी ग्राहकांना १ जानेवारीपासून मोबाईल नंबरच्या आधी शून्य लावणे अनिवार्य होणार आहे. दूरसंचार विभागाने ट्रायच्या या निर्णयाला मान्यता दिली आहे. ट्रायने या प्रकारच्या कॉलसाठी मोबाईल क्रमांकाआधी शून्य लावण्याची शिफारस २९ मे २०२० रोजी केली होती.या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणे सोईस्कर होणार आहे.दूरसंचार कंपन्यांना या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी १ जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.मोबाईल क्रमांक डायल करण्याच्या पद्धतीत अशा प्रकारच्या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवेसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version