Marathwada Sathi

कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना

मराठवाडा साथी न्यूज
कन्नड :
तालुक्यात अतीवृष्टी ने मका, कपाशी आदीसह अनेक पिकांचे नुकसान केले आहे. परतीच्या पावसापासून वाचलेला कापूस वेचणीसाठी सध्या मजूरच मिळत नसल्याने हजारो क्विंटल कापूस शेतात उघड्यावर आहे. यामुळे पावसाच्या भितीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


अती पावसामूळे कपाशी च्या उत्पन्नामध्ये मोठया प्रमाणात घट निर्माण झाली आहे. कारण की थोडया प्रमाणात झाडाला लागलेल्या सर्व कैरी फुटून गेल्याने कापसाच्या झाडे पूर्णपणे वाळून गेले आहे त्यामुळे मोठया प्रमाणात घट निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यात फुटलेल्या कापसाला वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्गाला घरातील सर्व सद्स्यांना घेऊन कापूस वेचणी करावी लागत असल्याचे िचत्र जेहूर . निपाणी . आडगाव . गव्हाली औराळा सह परीसरात पहावयास मिळत आहे कारण मजूरांनी 250 रूपये रोज व 30, ते 35 रूपये पाशरी प्रमाणे भाव मागत असल्याने सध्या मजूरांना सूगीचे दिवस आले आहेत. मात्र ,कपाशी एक ते दोन वेचणीत संपनार आहे त्यामूळे उत्पन्नामध्ये मोठी घट होणार आहे .


कपाशी एक दोन वेचणी संपनार असून कपाशीला नंतर फुल पत्ती नसल्याने लवकरच पऱ्हाटया झाल्या ने उत्पन्नात शेतकरी वर्गचा खते बियाणे. औषधी मशागत आदीचा केलेला खर्च सूदधा फिटणार नसल्याने शेतकरी वर्ग पून्हा कर्जबाजारी होण्याची भीती भानुदास पवार यांनी व्यक्त केली.

Exit mobile version