Home समाज अक्कलकोटमध्ये भाविकांना ‘नो एन्ट्री’…!

अक्कलकोटमध्ये भाविकांना ‘नो एन्ट्री’…!

33
0

मराठवाडा साथी न्यूज

सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अक्कलकोटमध्ये भाविकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.दत्त जयंतीनिमित्त भाविकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याविषयी आदेश जारी केले आहेत.

काय आहे आदेश

  • २८ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजल्यापासून ते ३१ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना अक्कलकोट शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या पालख्या,दिंड्यांना शहरात प्रवेश करण्यास मनाई आहे.
  • स्वामी समर्थ समाधी ठिकाण, स्वामी समर्थ मंदीर आणि अन्नक्षेत्र या तिन्ही ठिकाणी विश्वस्त समिती मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • महसूल, पोलीस, आरोग्य, अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांची वाहतूक, आपत्ती निवारण व्यवस्थापनमधील अधिकारी, कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

दरम्यान, या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती,संस्था किंवा संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार देखील कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here