Marathwada Sathi

कोणताही व्यवसाय ‘लहान’ किंवा ‘मोठा’ नसतो…!

मराठवाडा साथी न्यूज

सेलू : सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.अश्यावेळी ही बेरोजगार मंडळी बँकांकडून पैसे घेते,पण नंतर जेव्हा बँकेत पैसे परत फेडण्याची वेळ येते तेव्हा ते पैसे परत करत नाहीत. यामुळे अश्या लाभार्थ्यांचा सिबिल स्कोर खराब होतो आणि त्यामुळे त्यांची पत हि खराब होते.ज्यामुळे पुढच्यावेळेस या बँका अश्या बेरोजगारांना पुन्हा बँकेत येऊ देत नाहीत आणि त्यांची मदत करत नाहीत.

‘जर पत टिकवली तर,बँक आपल्या दारात येईल’असे वक्तव्य काल(१४ डिसें.)सेलू येथे आयोजित ‘रोजगार मेळाव्यात’ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर यांनी केले.शासकीय योजनांचा लाभ घेतांना केवळ योजना म्हणून त्याकडे बघणे चुकीचे असून,त्याकडे एक रोजगार म्हणून बघणे गरजेचे आहे.कोणताही व्यवसाय हा लहान नसतो प्रत्येकाची मानसिक पातळी हा व्यवसाय ठरवते.असेही यावेळी मानवतकर म्हणाले.

यावेळी भिमप्रहारचे संस्थापक प्रा.डॉ.प्रवीण कनकुटे,मिलिंद सावंत,तुलजेश यादव इत्यादींची उपस्थिती होती. या संघटनेचे चे विश्वजित वाघमारे यांनी आपली भूमिका विशद करत तरुणांनी सक्षम होत पुढे जावे व याकामासाठी आम्ही सर्वोत्तपरी सोबत आहोत असे आपल्या बोलण्यातून स्पष्ट केले.

दरम्यान,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमप्रहार व युथ फोरमच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

Exit mobile version