Marathwada Sathi

निती आयोगाचं आवाहन ,गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन करण्यात आले आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली.निती आयोगाची आज बैठक झाली. या बैठकित महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. शिंकताना, खोकताना तोंडावर मास्क किंवा रुमाल वापरण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. नवीन H3N2 विषाणू देशात वेगाने वाढत आहे. हा विषाणू कोरोनासारखा पसरू शकतो. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. व्हायरस रोखण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य विभागांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रसार केला जात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात असे सांगण्यात आले आहे की, हा विषाणू श्वसनाच्या संसर्गामुळे होत आहे.

Exit mobile version