Home क्रीडा ICC कसोटी स्पर्धेत न्यूझीलंड पहिल्यांदाच पहिल्या स्थानावर

ICC कसोटी स्पर्धेत न्यूझीलंड पहिल्यांदाच पहिल्या स्थानावर

485
0

पाकिस्तानचा पराभव करत न्यूझीलंड पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे.

न्यूझीलंड : कसोटी सामन्यात पाकिस्तानचा २-०ने पराभव करत न्यूझीलंडने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. ११८ गुणांसह न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर ११६ तर तिसऱ्या क्रमांकावर अससेल्या भारतीय संघाच्या नावावर ११४ गुणांची नोंद आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तान संघाचा डाव आणि १७६ धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं पहिल्या डावांत २९७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना केन विल्यमसनच्या द्विशतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ६५९ धावा केल्या होत्या.प्रतिउत्तरदाखल पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावांत १८६ धावांवर आटोपला.मागील १७ सामन्यापासून न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. आज न्यूझीलंडनं लागोपाठ सहावा विजय मिळवला आहे. तर तिसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. २०१७ मध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडला पराभवचा धक्का बसला होता. मागील १७ कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडनं १३ सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामने अनिर्णीत राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here