Marathwada Sathi

मेनूकार्ड संदर्भात नवीन नियम जारी…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने’ मेनू लेबलिंगसाठी एक महत्वाचा निर्णय घेत एक नियम तयार केला आहे.ज्या नियमाअंतर्गत आता रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डमध्ये आहाराचे पौष्टिक मूल्य लिहिणे आवश्यक असणार आहे.फक्त एवढेच नाही तर नियमावली तयार करताना पोषक तत्त्वांचे प्रमाण देखील लिहावे लागणार आहे. भारत सरकारने यासंदर्भात नवीन नियमावली व प्रदर्शन नियमन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, हे नियम १० पेक्षा जास्त शाखा असलेल्या रेस्टॉरंटना लागू होईल.

दरम्यान,भारत सरकारच्या या अधिसूचनेनुसार मेनू कार्ड, डिस्प्ले बोर्ड किंवा बुकलेटसह त्या वस्तूच्या पौष्टिक मूल्याची माहिती देणे आवश्यक झाले आहे. पिझ्झा विकणारी फूड शाखा,पिझ्झा हट,डोमिनोज, मॅकडोनाल्ड इत्यादी बर्गरलाही त्यांच्या खाद्यपदार्थाच्या कॅलरीबद्दल माहीती द्यावी लागेल. यासह,हॉटेल आणि बरीच रेस्टॉरंट्सना सुद्धा आपल्या मेनूवरील खाद्यपदार्थामध्ये किती कॅलरी आहे याबद्दल माहिती द्यावी लागेल.

Exit mobile version