Home मनोरंजन नेहा पेंडसे दिसणार “अनिता भाभी “च्या भूमिकेत !

नेहा पेंडसे दिसणार “अनिता भाभी “च्या भूमिकेत !

91
0

मुंबई :” भाभीजी घर पर हैं “या मालिकेतील “अनिता भाभी “चा रोल आता नेहा पेंडसे करणार आहे. गेल्या 5 महिन्यांपासून गौरी खान या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीच्या शोधात होती. शेवटी सौम्या टंडनच्या जागी अभिनेत्री नेहा पेंडसेंची या मालिकेत वर्णी लागली आहे.

भाभी जी घर पर हैं या मालिकेसाठी दिग्दर्शक संजय कोहली यांनी आधी सौम्या टंडनलाच विचारणा केली होती. पण ती मालिका सोडून गेल्यानंतर निर्मात्यांनी मराठमोळ्या नेहा पेंडसेला विचारणा केली होती. .सुरुवातीला नेहाने नकार दिला होता. पण 4 महिन्यांनी निर्मात्यांनी पुन्हा नेहाशी संपर्क केला तेव्हा तिने या प्रोजेक्टला होकार दिला. सौम्या टंडनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच ही मालिका सोडली होती.जवळजवळ 5 वर्ष मालिकेत काम केल्यानंतर तिने अनिता भाभीची भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे आता मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे “अनिता भाभी ” च्या भूमिकेत दिसणार आहे. तिने मालिकेच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here