Marathwada Sathi

नेहा कक्करने दिली ‘गुड न्यूज’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नुकतेच(२४ ऑक्टो.)प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर चा बॉयफ्रेंड रोहनप्रीतसोबत विवाह झाला.लग्नानंतर नेहा आणि रोहनचे लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आता नेहाने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती आणि रोहनप्रीत दिसत आहेत. या फोटोवर तिने ‘ख्याल रखा कर’ असा हॅशटॅगही दिला आहे. या पोस्टमधील फोटोवरून ती गर्भवती असल्याचे दिसून येत आहे.फोटोच्या कंमेंट मध्ये रोहनप्रीत याने आता तर अजून काळजी घ्यावी लागेल असे लिहिले आहे.त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव केला आहे.

https://www.instagram.com/p/CI7E-TWDDbA/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version