Marathwada Sathi

भारती सिंहच्या मुंबईतील घरावर NCB ची छापेमारी ; घरातून अंमली पदार्थ जप्त

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. दरम्यान एनसीबीने प्रसिद्ध कॉमेडियन ‘भारती सिंह’ आणि तिचा नवरा ‘हर्ष’ यांच्या घरावर ड्रग प्रकरणात छापेमारी केली आहे. या छापेमारीतून नार्कोटिक्स कंंट्रोल ब्युरोने काही प्रमाणात ‘ड्रग्ज’ देखील जप्त केले आहेत.

मुंबईतील अंधेरी परिसरात एनसीबीने ही छापेमारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीच्या ठिकाणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती दोघेही उपस्थित होते. या दोघांवरही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीला या दाम्पत्याच्या ड्रग सेवनाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीत काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Exit mobile version