Home मराठवाडा भारती सिंहच्या घरावर NCB चा छापा

भारती सिंहच्या घरावर NCB चा छापा

305
0

मुंबई : कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील निवासस्थानी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला.बॉलिवूडशी निगडित बड्या नावांच्या घरांवर छापे पाडण्याच्या मालिकेतील ही सर्वात ताजी घटना आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कॉमेडियन भारती सिंह यांच्या मुंबईतील निवासस्थानी शनिवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला.

अभिनेता अर्जुन रामपाल आणि चित्रपट निर्माता फिरोज नाडियावाला यांच्यावरही या महिन्याच्या सुरुवातीला ड्रग्जच्या संदर्भात एजन्सीने छापा टाकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here