Marathwada Sathi

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरात आणि कार्यालयात एनसीबीचा छापा

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. एनसीबीने अर्जुनच्या कार चालकाला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो [NCB] ने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा टाकला. एनसीबीच्या एका पथकाने अर्जुनच्या घरावर आणि कार्यालयात छापे टाकले. एनसीबी च्या सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन रामपालच्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान अर्जुन रामपाल याच्या घरातून एनसीबीच्या हाती काही लागले की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Exit mobile version