Home औरंगाबाद नवरात्रीत अन्नपूर्णेचा उपवास !

नवरात्रीत अन्नपूर्णेचा उपवास !

957
0


संदीप बेदरे/ औरंगाबाद
आदिशक्तीचा उत्सव म्हणून नवरात्री साजरा केला जातो. विश्वातील दया, क्षमा, शांती, विद्या, धन, आणि विशेष म्हणजे सर्वाधिक सहनशक्तीचा अवतार असलेली आधी शक्ती चा उत्सव सध्या सुरू झालेला आहे. शेकडो, हजारो लोकांच्या जठरातील अग्नी शांत करणारी अन्नपूर्णा देवी कधीच गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य, दलित-सवर्ण असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांसाठी आपले हात स्व चलित ठेवते. पण नवरात्री उत्सवात देखील उपवास करणारी आदिशक्ती अन्नपूर्णा औरंगाबाद शहरातील एका खानावळी मध्ये अत्यंत निर्बल तेणे दिसून आल्याने हृदयाचा ठोका चुकल्याची जाणीव झाली.
कोरोना महामारीने गेल्या सहा महिन्यापासून हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे बेहाल केलेले आहेत. सर्वकाही लॉक डाऊन असल्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या अनेकांना सहा महिन्यांमध्ये उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली होती. काही ही समाजसेवकांनी या पृथ्वीतलावर राहणाऱ्या उपाशीपोटी लोकांना अन्नधान्य आणि दोन वेळचे जेवण देण्यासाठी आपल्या अन्नधान्याच्या गोदामात सार्वजनिकरित्या वाटप करून जगातील सर्वात मोठे पुण्य कळविण्याचे काम केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह केंद्र शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हातावरचे पोट असणाऱ्या ज्या लोकांची हाते बांधली गेली होती, ती खुली होण्यास मदत झाली. आणि त्यांच्या हाताला काम मिळू लागले. राज्यातील रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि खानावळी सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर हातावरचे पोट असणाऱ्या या लोकांना काहीसा आधार मिळाला. यातच वर्षातून एकदा येणारा आदिशक्ती नवरात्रीचा सण येऊन ठेपला.
औरंगाबादच्या अशाच एका खानावळी मध्ये शेकडो नव्हे तर हजारो लोकांच्या जठराची अग्नी भागविणाऱ्या एका अन्नपूर्णेचा दृष्टांत दोन दिवसांपूर्वी झाला. त्या माय माऊलीला विचारणा केली असता तिने सांगितले की, ” सध्या नवरात्री सुरू आहे. आणि नऊ दिवसाचे उपवास मी धरले आहेत. त्यामुळे मी फक्त उपवासाला लागेल तेच अन्न ग्रहण करत आहे.”
त्या खानावळी मध्ये येणाऱ्या शेकडो-हजारो नागरिकांना स्वादिष्ट जेवण देणारी अन्नपूर्णा आदिशक्ती माय माऊलीचा उपवास करत असताना खानावळीच्या पाठीमागे एका शिडीवर बसून फराळ करत असलेली दिसल्याने खरोखरच मन भरून आले. यातच त्या माऊलीने फराळाच्या शाबुदाणातील काही भाग आपल्या साडीला गाठ बांधल्याने तिला विचारले असता हा माझ्या लेकरांसाठी घेऊन चालले! असे प्रत्युत्तर आल्यानंतर डोळे पाणावले. खरोखरच आज एकीकडे आपण आदिशक्ती माय माऊलीचा नवरात्र उत्सव साजरा करत असताना अशाही काही माऊली आहेत, हा दृष्टांत समोर आल्यानंतर खरंच माऊलीचे महत्व प्रत्येकाला कळल्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here