Home मराठवाडा नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष गाडीस मुदतवाढ – वेळेत बदल

नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष गाडीस मुदतवाढ – वेळेत बदल

83
0

पूर्णा : प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे नांदेड-पनवेल-नांदेड हि उत्सव विशेष गाडी चालवीत आहे. या गाडीस एका महिन्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. या गाडीमध्ये अनारक्षित प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही, हि गाडी पूर्णपणे आरक्षित आहे.
या उत्सव विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

1) गाडी संख्या 07614 – नांदेड ते पनवेल उत्सव विशेष गाडी: या विशेष गाडीला दिनांक 30 नोवेंबर ते 30 डिसेंबर, 2020 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. हि गाडी दिनांक 30 नोवेंबर पासून बदलेल्या वेळेनुसार धावेल. हि गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून दुपारी -17.35 वाजता सुटेल आणि पूर्णा-18.00 , परभणी-18.32 , परळी-20.30 , पुणे -06.20 मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी – 09.00 वाजता पोहोचेल.


2) गाडी संख्या 07613– पनवेल ते नांदेड उत्सव विशेष गाडी : या विशेष गाडीला दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. हि गाडी दिनांक 1 डिसेंबर पासून बदलेल्या वेळेनुसार धावेल. पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 16.00 वाजता सुटेल. पुणे-19.30, परळी- 05.50, परभणी-06.52 , पूर्णा -07.30 मार्गे नांदेड ला सकाळी – 08.45 वाजता पोहोचेल.
या विशेष गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -19 संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here