Home औरंगाबाद माझे कुटुंब-माझी जबाबदारी : औरंगाबाद मनपात सामूहिक प्रतिज्ञाचे वाचन

माझे कुटुंब-माझी जबाबदारी : औरंगाबाद मनपात सामूहिक प्रतिज्ञाचे वाचन

86
0

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून रोज हजारो रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” अंतर्गत लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व नागरिकांनी प्रतिज्ञा घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्याकरिता महापालिकातर्फे मंगळवारी (दि. ६ ऑक्टो) सकाळी अकरा वाजता “सामूहिक प्रतिज्ञा” घेण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए.बी.देशमुख, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रेमलता कराड, डॉ. मेघा जोगदंड, नगर सचिव डी. डी. सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांची उपस्थिती होती.
यासोबतच पालिकेच्या सर्व वार्ड कार्यालय, यांत्रिकी विभाग, सेंट्रल नाका आणि सर्व आरोग्य केंद्र येथेही प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here