Home अहमदनगर “मुस्कान ” मुळे पोलीस झाले हिरो

“मुस्कान ” मुळे पोलीस झाले हिरो

472
0

अहमदनगर पोलिसांच्या ‘ऑपरेशन मुस्कान’ ने आणली चेहऱ्यावर “मुस्कान “

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांनी अनेकांच्या चेहऱ्यावर मुस्कान आणली. याचे कारण म्हणजे “ऑपरेशन मुस्कान.” अहमदनगर येथील अपहरण झालेल्या 200 लहान बालकांपैकी 77 बालकांचा शोध येथील पोलिसांनी लावला आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’द्वारे बालकांसह हरवलेल्या 1 हजार 11 प्रौढ व्यक्तींचाही शोध पोलिसांनी घेतला आहे.यासोबतच हरवलेल्या मुलांनाही या ऑपरेशनमध्ये शोधण्यात आले.

२०० अपहरणाचे होते गुन्हे दाखल :
जिल्ह्यात 200 लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 77 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 301 व्यक्ती हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात घरातून रुसून गेलेली आणि त्रासास कंटाळून घराबाहेर गेलेल्या मुलांनाही शोधून त्यांना परत त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांचा रेकॉर्ड :
1 हजार 210 महिलांपैकी 621 आणि 1 हजार 91 पुरुषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आला.१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये 1 हजार 88 बालके व महिला, पुरुषांचा शोध घेण्यात आला.यामुळे अहमदनगर जिल्यातील पोलिसांचे सर्वीकडून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here