Marathwada Sathi

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज(१० डिसें.)सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांचे वय ४७ वर्ष होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ९:३० वाजता कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ मध्ये ठेवण्यात येणार असून सकाळी ११ वाजता ‘वैकुंठ स्मशानभूमी’ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील,पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

संगीतकार भिडे यांच्या विषयी थोडक्यात

सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत.त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे घेतले असून पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले.त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्स यांच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली होती.

दरम्यान,‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

Exit mobile version