Home औरंगाबाद लोकशाहीचा खून – पाटील

लोकशाहीचा खून – पाटील

69
0


मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद :राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचा लिलाव होत असल्याच्या घटनांची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सोमवारी दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

“लोकशाहीची क्रूर थट्टा, भीषण खून चाललेला आहे. त्यामुळे गावामध्ये बिनविरोध निवडून येण्यासाठी विकास निधीचं आकर्षण दाखवणं हे ठीक आहे. सरपंचपदाची बोली बोलायची आणि बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली हे स्वागतार्ह आहे.” अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं राज्यात सध्या १४ हजार ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, निवडणुकीच्या माध्यमातून गावात गटबाजी किं वा तंटे वाढू नयेत, यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न के ला जात आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचा चक्क लिलाव करण्यात आल्याने राज्यभरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here