Home क्राइम नागापूर (बु.) परिसरात तरूणाची निर्घृण हत्या

नागापूर (बु.) परिसरात तरूणाची निर्घृण हत्या

नागापूर (बु.) येथील एका युवकाच्या पोटात, हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खुन केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) उडकीस आली. आंथरवणपिंप्री फाटा परिसरात युवकाचा मृतदेहअ ढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

521
0

मराठवाडा साथी न्यूज

बीड: शहरापासून काही अंतरावर असलेल्या नागापूर (बु.) येथील २३ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी (दि.6) सकाळी अंथरवण पिंप्री फाटा परिसरात झोपलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह अढळून आला. या घटनेने नागापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुतेकर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. मयताच्या पोटावर, हातावर गंभीर वार करण्यात आले. पोलिस पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पिंपळनेर पोलिसात अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

 नागापूर (बु.) येथील राजेंद्र अशोक खराडे (वय २३) वर्षे हा गुरुवारी (दि.5) रात्री 8:30 दरम्यान घरातून बाहेर पडला होता. शुक्रवारी (दि.6) सकाळी बीडपासून काही अंतरावारील आंथवरणपिंप्री फाटा परिसरत रस्त्याच्या कडेला एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती काही नागरीकांनी पिंपळनेर पोलिसांना दिली. प्राप्त माहिती नुसार पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री भताने यांनी सहकाऱ्यांघेऊन घटनास्थळ गाठले. प्रथम मयताची ओळख पटवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. राजेंद्र खराडे यांच्या पोटात, हातावर, पायावर तीक्ष्ण हत्याराने खोलवर वार केल्याच्या खुना अढळून आल्या. पोलिस पंचनाम्या नंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. खुनाचे कारण मात्र समजु शकले नाही अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पिंपळने पोलिस करत आहेत. पोलिस निरिक्षक श्री. भुतेकर शेख, सावंत, जोशी, तेलप, सुरवसे यांच्यासह बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळास भेट देऊन पहाणी केली. खुनाचे कारण समजु शकले नसले तरी पोलिस तपासत अज्ञात मारेकऱ्यांसह कारण समोर येणार आहे. घटनेचा पुढील तपास पिंपळनेर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here