Home क्राइम १९ वर्षीय तरुणीची हत्या….

१९ वर्षीय तरुणीची हत्या….

96
0


मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबईतील खार परिसरात एका १९ वर्षीय तरुणीचा इमारतीच्यावरच्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेत पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. हा अपघात आहे किंवा हत्या याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. खार परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीच्या छतावर नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत या तरुणीचा दोन जणांसोबत वाद झाला. वादानंतर ते दोघे जण तरुणीला पार्टीतून बाहेर घेऊन आले. त्यानंतर तिघांमध्ये झालेल्या झटापटीत तरुणी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून कोसळली आणि यात तिचा मृत्यू झाला.


गुरुवारी रात्री नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या घरात पार्टी करण्यात आली होती. पार्टी तिच्या मित्राच्या घराच्या टेरेसवर सुरु होती. खार पोलिसांनी या तरुणीच्या प्रियकर आणि तिच्या एका मित्राला याप्रकरणी संशयावरुन ताब्यात घेतले आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, पीडित महिलेची ओळख पटली आहे. ती नव वर्षानिमित्त आयोजित घरच्या पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीच्यावेळी पीडिता तिच्या प्रियकराला तिच्या एका मैत्रिणीबरोबर छतावरील पाण्याच्या टाकीजवळ पाहिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रियकराचा आणि तिच्या मित्राशी बोलणे झाल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला.दोघांनी तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले आहे. त्यावेळी ती इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढत होती. यावेळी तिला ढकलण्याचा प्रयत्न झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत खार पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार तिला भिंतीवर ढकल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here