Marathwada Sathi

माझ्याच बाबतीत पालिकेचा भेदभाव….

मुंबईः ‘शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही,’ असा दावा अभिनेता सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. सोनू सूदनं जुहूमधील आपल्या मालकीच्या शक्तिसागर या निवासी इमारतीला निवासी हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यासाठी मुंबई महापालिकेची आवश्यक ती परवानगी न घेताच इमारतीत अंतर्गत बदल व अतिरिक्त बदल केले आहेत. तसंच, हे बेकायदा हॉटेल अधिकृत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मुंबई महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. पालिकेच्या या आरोपांनतर आज न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली.

Exit mobile version