Home क्राइम MumbaiNewsUpdate : प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांना अटक

MumbaiNewsUpdate : प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांना अटक

200
0

प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रीया यांना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या कारवाईत छाब्रीया यांची पॉश कारही जप्त केली आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटिलिजन्स युनिटने ही कारवाई केली असून या कारवाईने कारजगतात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, छाब्रीया यांच्यावर नेमकी कोणत्या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

दिलीप छाब्रीया हे भारतीय कार जगतातील खूप मोठं नाव असून अनेक सेलिब्रिटींकडे छाब्रीया यांनी डिझाइन केलेल्या कार आहेत. डीसी डिझाइन या कार मॉडिफिकेशन स्टुडिओचे ते संस्थापक असून ग्राहकांच्या पसंतीला उतरतील आकर्षक आणि आलीशान कार त्यांच्या स्टुडिओत तयार केल्या जातात.

दरम्यान दिलीप छाब्रीया यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात आज अटक करण्यात आली असली तरी अधिक तपशील समजू शकला नाही मात्र या कारवाईच्या वृत्ताला सह पोलीस आयुक्त (क्राइम) मिलिंद भारंबे यांनीही दुजोरा दिला आहे. छाब्रीया यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) आणि ३४ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here