Marathwada Sathi

मुंबई लोकल सुरु होणार…?

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबई लोकल संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे.मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे.त्यामुळे आता मुंबई लोकलसंर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतर घेण्यात येणार आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्य सरकारकडून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.ज्यामध्ये रात्री १० वाजेपर्यंत ते स.७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवास करता येईल.असे या प्रस्तावामध्ये सांगण्यात आले आहे.मात्र,काल(४ जाने.)राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचे ८ रुग्ण सापडले ५ रुग्ण हे मुंबईमधील आहेत.त्यामुळे आता मुंबई लोकल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई लोकलसंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version