Marathwada Sathi

मुंबईमध्ये सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर; MIDC अंतर्गत रिक्त पदांसाठी कसा कराल अर्ज

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कामकाज जलदगतीने होण्यासाठी ११ महिन्याच्या करारासह काही जागांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज प्रत्यक्ष सादर करता येतील किंवा आपण gmhrd@midcindia.org या ईमेलवर सुद्धा अर्ज पाठवू शकता. ही भरती प्रक्रिया १६ जागांसाठी राबवण्यात येणार असून, उपलब्ध पदे त्यासाठी पात्रता व अन्य निकष जाणून घेऊया.

पदाचे नाव – तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)

पदसंख्या – १६ जागा

शैक्षणिक पात्रता – अर्ज केलेल्या पदाचा अनुभव (निदान ५ वर्षे) असणे आवश्यक

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – gmhrd@midcindia.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचे ठिकाण: “बर्वे सभागृह” महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.

महत्वाची कागदपत्रे:
शासकीय संस्थेकडील सेवानिवृत्तीचा आदेश

शैक्षणिक पात्रता व इतर परिक्षा उत्तीर्ण असल्याच्या प्रमाणपत्रांच्या प्रती

अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो सांक्षाकित करुन चिकटवावा.

आधार कार्ड व पॅनकार्ड प्रत.

सेवानिवृत्तीचे वेळी मिळणारे वेतनाचा दाखला (वेतनपावती)

Exit mobile version