Home क्रीडा मुंबई, दिल्ली, बंगलोरची प्लेऑफमध्ये धडक

मुंबई, दिल्ली, बंगलोरची प्लेऑफमध्ये धडक

241
0

मराठवाडा साथी न्यूज

दुबई : मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. या सीझनमधील प्लेऑफसाठीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार, यावरून प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानी कोणता संघ स्थान मिळवणार हे ठरणार आहे.

प्ले-ऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर; अशा होणार लढती

यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा प्लेऑफच्या सामन्यांची ठिकाणं आणि तारखी सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCIने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या मोसमातं आता खऱ्या अर्थाने रंगत यायाला सुरुवात झाली आहे.

5 नोव्हेंबर : क्वालिफायर 1 संघ 1 विरूद्ध संघ 2 दुबई
6 नोव्हेंबर : एलिमिटर संघ 3 विरूद्ध संघ 4 अबु धाबी
8 नोव्हेंबर : क्वालिफायर 2 क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ विरूद्ध एलिमिटर मधील विजेता संघ अबु धाबी
10 नोव्हेंबर: अंतिम सामना दोन्ही क्वालिफायर विजेता संघ दोन्ही क्वालिफायर विजेता संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here