Home बीड महावितरण कार्यालयात सौरपंप योजनेचा आमदाराने घेतला आढावा रोमॅट, रोटोमॅक आणि सीआरआय कंपन्यांची...

महावितरण कार्यालयात सौरपंप योजनेचा आमदाराने घेतला आढावा रोमॅट, रोटोमॅक आणि सीआरआय कंपन्यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार – आ. लक्ष्मण पवार

536
0

गेवराई
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या सोलार पंप योजनेत शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. अनेकांच्या फिंटिंगचे काम झाले नसून, जिथे पूर्ण झाले त्यात ही प्रॉब्लेम आहेत. मंजुरी मिळवूनही रोमॅट आणि रोटोमॅक या दोन कंपन्या कडून फिटिंग चे काम झालेले नाही. सीआरआय कंपनीच्या फिटिंग झालेल्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने या तीनही कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आ.पवार यांनी येथे सांगितले आहे.
गेवराई तालुक्यातील सोलर पंप फिटिंग बाबत आ.पवार यांनी दि.२८ रोजी महावितरण कार्यालयात बैठक घेऊन सोलार योजनेचा आढावा घेतला. यावेळी उपअभियंता शिवलकर, सोलार कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी यांच्यासह अनेक तक्रारदार शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी आ.पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्व कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधी यांच्याकडून आपल्या सुरू असलेल्या कामाबाबतचा लेखी आढावा घेतला व बाकी असलेली सर्व फिंटिंगचे काम येत्या 2 महिन्याच्या आत पूर्ण करा आशा सूचना दिल्या. मात्र काही कंपन्यांनी अद्याप एकही फिंटिंगचे काम केलेले नाहीत. दरम्यान आ.पवार यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच एक आढावा बैठक घेऊन उपस्थित कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधीनामंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंप दोन महिन्यांच्या आत फिटिंग झाले पाहिजेत नसता मी आपल्या कंपनीच्या नावाने मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कामाला गती देत तात्काळ कामे सुरू केली. परंतु रोमॅट आणि रोटोमॅक कंपनीने अद्यापपर्यंत एकही फिटिंग केले नाही व सीआरआय कंपनीच्या सुरू असलेल्या पंपाचे अनेक प्रॉब्लेम असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी या बैठकीत आ.पवार यांच्याकडे केल्या. याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आता या कंपन्यांच्या नावाने मुख्यमंत्री यांना लेखी तक्रार करणार असल्याचे सांगून या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास त्यांनी या बैठकीत बोलताना व्यक्त केला.
दरम्यान चालू असलेल्या पंपाबाबत काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्या तात्काळ संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीना सूचना करत निकाली काढल्या. तसेच सोलार बाबत तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा असेही आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here