Marathwada Sathi

सासू- सासरे आणताय; जैन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव ..

मराठवाडसाथी न्यूज
गुजरात : गुजरातच्या एका महिलेने सासू-सासऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. जैन धर्म स्वीकारण्यासाठी सासू-सासरे आपल्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप तिने केला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील प्रल्हादनगरमध्ये ही महिला राहते. एका ब्राह्मण कुटुंबात या महिलेचा जन्म झाला आहे. तक्रारदार महिलेचा प्रेमविवाह झाला आहे. जैन समाजातील मुलाबरोबर तिचे लग्न झाले. एसजी रोडवरील एका खासगी कंपनीत ती आणि तिचा प्रियकर एकत्र काम करायचे. तिथेच त्यांचे प्रेम जुळले. त्यांनी पुढे जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आनंदनगर पोलीस ठाण्यात तिने एफआयआर नोंदवला आहे. यावर्षी ३० जानेवारीला हिंदू पद्धतीने आमचा विवाह झाला.१० फेब्रुवारीला विवाहाची नोंदणी केली. माझ्या नवऱ्याला जर्मनीमध्ये नोकरी मिळाली. १७ फेब्रुवारीला तो तिथे शिफ्ट झाला. नवऱ्याने मला सोबत जर्मनीला नेण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याने शब्द पाळला नाही. तो मला, सॅटलाइट सिटीमध्ये सासू-सासऱ्यांकडे सोडून गेला. नवरा विदेशात निघून गेल्यानंतर सासू-सासऱ्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. ते वेगवेगळया प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक आहेत. जैन धर्माचा स्वीकार करण्यासाठी सासू-सासरे माझ्यावर दबाव टाकत होते, असा आरोप महिलेने केला आहे. .जेव्हा मी विरोध करायचे, तेव्हा ते मला अपशब्द सुनावायचे. जुलैमध्ये नवरा जर्मनीहून परत आला. त्यावेळी त्यांनी नवऱ्याचे कान भरले. त्यामुळे त्याने मला मारहाण केली असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. “सासरकडच्या मंडळींनी तिच्याकडे हुंडयाची सुद्धा मागणी केली. तिने नकार दिला, तेव्हा नवऱ्याने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले व प्रल्हादनगरमधील तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडले” असे या प्रकरणाशी संबंधित तपास अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version