Home बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोटेगाव, घाटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोटेगाव, घाटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

186
0

केज ÷ केज तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. गावा-गावात होणारे राजकारण व त्यावरील खर्च टाळून एकजुटीने गावच्या विकासाचा ध्यास घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढाव्यात याकडे सर्वांचा कल आहे.
त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोटेगाव,घाटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध काढल्या आहेत. तसेच पाथरा चे पाच सदस्य तर सुकळी तीन सदस्य बिनविरोध आले आहेत.
यात मोटेगाव गावातील श्री.रामकृष्ण विश्वनाथ पौळ,श्री.नितीन धोंडीबा बचुटे,सौ.वर्षा विनोद पौळ, सौ.अर्चना आण्णा साहेब पौळ, सौ.अनिता संदिपान बचुटे
घाटेवाडी गावातील अनिता शिवाजी गायकवाड, अंकुश पिलाजी रोमण,जिजाबाई अंकुश रोमण, जनाबाई बारीकराव गरबडे, सविता अभिमान शिंदे, प्रभाकर बाबुराव धुमक, सखुबाई मारूती काळे, वर्षा सतिष गिरी, लिंबा भानुदास हालकडे,
पाथरा गावातील नानासाहेब विठ्ठल पवार, आशा व्यंकट पवार, सखाराम मलिकार्जुन पांगे, मिरा पांडुरंग राऊत, छाया मेघराज राऊत तसेच सुकळी गावातील उर्मिला लालगिर गिरी,बालाजी हरिभाऊ गिरी,शिल्पा अशोक मस्के
याच उमेदवारांचे अर्ज आल्याने ते बिनविरोध विजयी झाले आहेत.
केज तालुक्यातील 2 ग्रामपंचायत बिनविरोध व पाथरा गावातील पाच सदस्य तसेच सुकळी गावातील 3 सदस्य बिनविरोध काढल्याबद्दल बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here