Home परळी वैजनाथ जास्तीत जास्त ग्राहकांनी बिल दुरूस्ती मेळाव्याचा लाभ घ्यावा –चंदुलाल बियाणी

जास्तीत जास्त ग्राहकांनी बिल दुरूस्ती मेळाव्याचा लाभ घ्यावा –चंदुलाल बियाणी

384
0

गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहर व तालुक्यातील विजग्राहकांच्या बिलाबाबतच्या तक्रारी निकाली काढण्याचा विचार विजवितरण कंपनीने पुढे आणला असून, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बिड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या ०६ जानेवारी ते ०८ जानेवारी या कालावधीत बिल दुरूस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.
दि.०६ जानेवारी ते ०८ जानेवारी दरम्यान परळी उपविभागातील विजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी बिल दुरूस्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे कार्यालयीन आदेश वरिष्ठ पातळीवरून काढण्यात आले असून, या तीन दिवसांत जास्तीत जास्त तक्रारींचा निवाडा करण्याचे आदेश पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या मेळाव्यात विजबिलांबाबतच्या तक्रारी समजून घेवून त्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली आहे. त्यामुळे परळी उपविभागातील विजग्राहकांनी बिल दुरूस्ती मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चदुंलाल बियाणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here