Home क्राइम मॉन्टी सिंगला दूर करून प्रेयसीची कपिलशी जवळीक

मॉन्टी सिंगला दूर करून प्रेयसीची कपिलशी जवळीक

3
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । लॉकडाऊनच्या काळात मॉन्टी सिंग बिहारमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याच्या फ्लॅटवर तीन महिने त्याची प्रेयसी मुक्कामी होती. याच काळात मॉन्टी सिंगच्या प्रेयसीचे कपिल सोबत चांगलेच सूत जुळले होते. त्यानंतर परत आलेल्या मॉन्टी सिंगच्या हाती दोघांचे व्हॉटस्अपवर केलेले मॅसेज लागले. त्यातून मॉन्टी सिंग हा प्रेयसीला वारंवार मारहाण करत होता. त्याचा राग प्रेयसीच्या डोक्यात होता. त्यामुळे तिने कपिलशी आणखीनच जवळीक केली. त्यातूनच मॉन्टी सिंग आणि कपिलमध्ये वाद शिगेला पोहोचला होता. दरम्यान, एका ढाब्यावर मॉन्टी सिंगने कपिलला मारहाणही केली होती. त्यामुळे कपिल आणखीनच शिगेला पेटला होता. अख्खी संपत्ती फुकेल पण मॉन्टी सिंगला संपवेल असे कपिलने एकापाशी बोलून दाखवले होते. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान मॉन्टी सिंग हत्या प्रकरणात अटकेतील आरोपी कपिल राजीव रापते (२६, रा. फ्लॅट क्र. ५, व्हिजन रेसीडेन्सी, रेणुकामाता कमानीजवळ, बीड बायपास) याला ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
मिटमिटा परिसरातील पिस होम सोसायटीतील मंटूशकुमार सिंग उर्फ मॉन्टी सिंग याची हत्या झाल्याचे २१ आॅक्टोबर रोजी उघडकीस आले होते. त्याचा मारेकरी कपिल रापते उर्फ राजे याला मंगळवारी पुण्यातील कुरकुंभ गावातून छावणी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून मॉन्टी सिंग आणि त्याचे प्रेयसीचे संबंध होते. या दोघांची ओळख मॉन्टी सिंगच्या एका मित्राने करुन दिली होती. त्यानंतर काही वर्षे आनंदाने गेले. मात्र, दोन वर्षांपासून मॉन्टी सिंग आणि त्याच्या प्रेयसीमध्ये वाद होऊ लागले. अनेकदा मॉन्टी सिंगने तिला मारहाण केली. त्यामुळे ती मॉन्टी सिंगपासून नाते तोडायच्या प्रयत्नात होती. याचवेळी तिला कपिलची साथ मिळाली. त्यामुळे ती आता कपिलला आपला बॉयफ्रेंड असल्याचे बाहेर सांगायची. दरम्यान, लॉकडाऊन काळात मॉन्टी सिंग बिहारमध्ये अडकला होता. फ्लॅटची एक चावी प्रेयसीकडे असल्याने तिने तीन महिने फ्लॅटवरच मुक्काम ठोकला होता. या काळात मॉन्टी सिंगची प्रेयसी कपिलच्या आणखीनच जवळ गेली होती. मॉन्टी सिंगने दिलेल्या त्रासाची सर्व कथा कपिलला ऐकवली. त्यामुळे कपिलला तिच्याबाबत अधिकच सहानुभूती निर्माण झाली. त्यातच हत्येपुर्वी देखील मॉन्टी सिंगने प्रेयसीला मारहाण केली होती. त्याचा राग कपिलला अनावर होत होता. १९ ऑक्टोबरच्या रात्री एकच्या सुमारास मॉन्टी सिंग मुकुंदवाडीत एका हॉटेलात पार्टी करुन दुचाकी घेऊन फ्लॅटवर गेल्यानंतर कपिल तेथे गेला. त्या रात्री दोघांनी सोबत जेवण केले. याचवेळी दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. त्यामुळे कपिलने लाकडी दांड्याने डोक्यात मारल्यानंतर पुन्हा चाकुने पोटात डाव्या बाजूला वार केला. व पळ काढला होता.

काठीने डोक्यात वार केल्याचा आव
पोलिस चौकशीत कपिलने आपण मॉन्टी सिंगला फक्त काठीने डोक्यात वार केला होता. चाकु कोणी भोसकला हे माहीत नसल्याचा आव आणत होता. मात्र, पोलिस तपासात त्याचे मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक पुरावे असल्याचे कळताच कपिलला गुन्हा कबुल करण्याशिवाय पर्याय नव्हता. पोलिसांनी कपिलचे दोन्ही मोबाईल जप्त केले असून हत्येसाठी वापरलेला चाकु अद्यापही सापडलेला नाही. हत्येवेळी अन्य साथीदार होते का याचाही पोलिस शोध घेत आहेत.

प्रेयसीची होणार सखोल चौकशी
मॉन्टी सिंगच्या हत्या प्रकरणात त्याच्या प्रेयसीची देखील सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात बुधवारी सांगितले. तिच्यावरुन हा वाद टोकाला गेल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळेच न्यायालयात कपिलची कस्टडी मागताना तिच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here